पक्ष्यांची किलबिल ऐकली, पक्षी-फुलपाखरे स्वछंद नाचताना दिसली की, आई-बाबा आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते
आता आमचे आई-बाबा नाहीत; पण अजूनही पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकली, ब्लू जे, कार्डिनल व रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे स्वछंद नाचताना, पंख फडफडवताना दिसली, समोरच अंगणात वा रस्त्यांत हरणे बागडताना दिसली, खारी, कुत्रे वगैरे प्राणीमित्र भेटले, ठरावीक वेळेला बदकांची मालिका आकाशात दिसली, मोर नाचताना पाहिला व कोकिळेचे सुस्वर गायन ऐकले की, आई-बाबाही सदैव आमच्यातच आहेत, आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते.......